आधुनिक जगात कसे वागावे ? अर्थात आनंदी जीवन जगण्याची कला | Vidyabhartee Adhunik Jagat Kase Vagave?
Book Description
Book Description
आजच्या संगणक व मोबाईल जीवनशैलीत आपल्या जीवनात झपाट्याने बदल होत आहेत. या बदलत्या जीवनशैलीमधे आनंददायी व प्रेरणादायी जीवन कसे जगता येईल ? यावर एक जीवनदृष्टी आधुनिक जीवनशैलीत आत्मविश्वासाने, सुसंवादाने आणि यशस्वीपणे कसे वागावे, याची व्यवहार्य जीवनदृष्टी तरुण, पालक, नोकरदार, गृहिणी, वरिष्ठ नागरिक आणि प्रत्येक कुटुंबासाठी दैनंदिन जीवनात उपयोगी संदर्भ. कुटुंब, पालकत्व, पती-पत्नीचे नाते, मित्र, कार्यालय, समाज आणि सोशल मीडिया अशा जीवनातील प्रत्येक महत्त्वाच्या क्षेत्रासाठी उपयुक्त सूचना. बदलते तंत्रज्ञान, आर्थिक साक्षरता, व्यक्तिमत्त्व विकास, मानसिक स्वास्थ्य आणि आनंदी जीवनासाठी कृतिशील मार्गदर्शन. कोणतेही प्रकरण स्वतंत्रपणे वाचता येईल अशा सोप्या, ओघवत्या आणि उदाहरणांसह मांडलेल्या शैलीत लेखन. आजच्या बदलत्या जगात सुजाण, सुसंस्कृत आणि यशस्वी व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी प्रत्येक घरात असावे असे प्रेरणादायी पुस्तक. लेखक परिचय: गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक विभागीय सचिव. आतापर्यंत 103 पुस्तकांचे लेखन, स्वयंविकास साहित्यातील नामवंत लेखक, विविध साहित्यात स्वयंविकास विषयावर विपुल लेखन, विविध सेमिनार्स व शिबिरांमध्ये व्यक्तिमत्व विकास, स्वयंविकास, मनाचे व्यवस्थापन, वेळेचे नियोजन, मानसिक ताण तणावांचे व्यवस्थापन या विषयांवर व्याख्याने, समुपदेशक म्हणून विविध समस्यांवर मार्गदर्शन, नाशिकरोड भूषण, ज्ञानतपस्वी, शिक्षणरत्न, गुणवंत गुरु, जीवनगौरव इत्यादी 25 पुरस्कारांनी सन्मानित, अंकज्योतिष तज्ञ, हस्तरेषा व रत्न तज्ञ, Ph.D. संशोधन मार्गदर्शक म्हणून आतापर्यंत 23 विद्यार्थ्यांना Ph.D. व M.Phil. साठी मार्गदर्शन.
